व्यसन्मुक्तची सुत्रे :
१. रोज सकाळी लवकर उठावे .
२. पी.टी., योगा, प्राणायाम, प्रार्थना, ध्यान करावे.
३. पोटभर नाश्ता करावा.
४. व्यसन विरोधी औषधीचे सेवन करावे.
५. पूर्ण दिवस आपले काम प्रामाणिकपणे करावे . आळस व कामचोरी करू नये.
६. सर्व कामे वेळेवर करावी.
७. संध्याकाळी पी.टी., योगा, प्राणायाम व ध्यान करावे.
८. डॉक्टरांच्या सल्यानुसार ओषधी सेवन करावी .
९. वेळेवर जेवण करून झोपावे.
१०. व्यसनी लोकांच्या सोबतीत राहू नये. जेथे व्यसनाची संभवना असेल अशा कार्यक्रमात जाऊ नये .
११. व्यसनाचा विचार मनात आल्यास, मनाला आज नाही , आत्ता नाही, नंतर कधी असा आदेश द्यावा.
सदभाव परिवाराची सूत्रे :
१. कुटुंबात अभद्र शब्द व शिवीगाळ करू नये.
२. स्वरक्षणाव्यतिरिक्त कोणत्याही कारणास्तव मारपीट, हिंसा उपद्रव करू नये.
३. कुटूंबात कोणाशीही भेदभाव करू नये. सर्वांशी सहयोग करावा. संयोगानेच विकास होतो व आनंद मिळतो.
४. रोज सकाळी घराच्या बाहेर निघताना आपल्या पुर्ण दिवसाचा कार्यक्रम कुटूंबाला सांगावा. आपल्या सर्व मित्राची व परिचितांची माहिती कुटुंबाला द्यावी.
७. कुटुंबात लहान मुले, महिला व जेष्ठ नागरिक यांची रेषा करावी व त्यांचे पालन पोषण करावे.