प्रवेश तपशील

प्रवेश तपशील

 
 

भरती प्रक्रिया - जळगाव महाराष्ट्र येथे प्रवेश प्रक्रिया

 
 
भरती प्रक्रिया
भरती प्रक्रिया - १. जळगाव महाराष्ट्र येथे प्रवेश प्रक्रिया - रोज सकाळी १० पासून संध्याकाळच्या ७ वाजे पर्यंत कोणत्याही प्रकारची सुटी नसते. जर रात्री उशिरा पेशंट अॅडमिट करावयाचा असल्यास तसे फोन वर आधी कळवणे अनिवार्य आहे. २. प्रवेश घेते वेळी रु. १२००० मात्र जेवण, नाश्ता इ. चा खर्च जमा करणे अनिवार्य आहे. प्रवेश घेतल्यावर दोन दिवस नंतर पेशंटचे संपूर्ण निदान केले जाते, त्यात रक्त तपासणी, त्याची संपूर्ण शारीरिक तपासणी व मानसिक तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून केली जाते. त्याच्या आधारावर पेशंटचे मेडिकल बिल दिले जाते, जे भरती झाल्यावर ७ दिवसांमध्ये जमा करणे अनिवार्य असते. 
सूचना/अलर्ट - प्रवेश घेते वेळी रु.१२००० जमा केल्यावर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये परत दिले जात नाही. पैसे दिलेल्या वेळेत जमा न केल्यास व्यसनपीडिताचा डिस्चार्ज केला जातो. 
उपलब्धता - साप्ताहिक आजचे विज्ञान, डॉ. अशोक शुक्ल यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक "व्यसनमुक्ती रहस्य", लायब्ररी, डेली न्युज पेपर्स. 
संपर्क करण्याची वेळ व माहिती - अॅडमिशनसाठी रोज सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजता व डिस्चार्ज ची वेळ सकाळी १० ते संध्या ७ पर्यंत मर्यादित असते. कोणत्याही कारणास्तव सकाळी १० चे आत व संध्या. ७ नंतर पेशंटला डिस्चार्ज दिला जात नाही. 
उपचार कार्यक्रम - व्यसनमुक्ती केंद्रांतील दैनंदिन कार्यक्रम - सकाळी ६ वाजता - प्रातविधी , ७ वाजता पि.टी.- योगा-प्राणायाम, ९ वाजता नाश्ता, मेडिकल चेकअप, प्रार्थना, १० वाजता शेअरिंग, ११ वाजता ग्रुप लेक्चर, १२ वाजता परामर्श, दुपारी १ वाजता जेवण व आराम, ४ वाजता चहा बिस्कीट, ४.३० वाजता पि.टी., योगा, ध्यान, प्राणायाम, मौन संध्याकाळी ६ वाजता प्रार्थना व दूध वाटप, ७ वाजता मेडिकल चेकअप, ८ वाजता भोजन ९ ते १० मनोरंजन व विश्रांती. 
उपचार घेतेवेळी रुग्णांना  दिले जाणारे शिक्षण - मनोअध्यात्मिक प्रवचन, शेअरिंग, कौन्सलिंग, पि.टी., योगा, प्राणायाम, ध्यान, मौन, सदभाव  परिवाराची सूत्रे,  व्याख्या, आरोग्यवर्धक सवयी, आजारांपासून बचावाचे उपाय, झोप न येण्याची कारणे व उपाय, मानसिक सुधार, व्यक्तिमत्व विकास इत्यादि. 


गुणवत्ता धोरण
गुणवत्ता धोरण - सदभाव व्यसनमुक्ती केंद्र हे व्यसनपीडित व्यक्तीशी केंद्रित आहे. व्यसनपीडित व्यक्ती व त्याचे कुटुंबियांचे कल्याण हेच आमचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी त्यांना सर्वोत्तम सेवा देणे, त्यांचे प्रभोधन करणे, त्यांना  व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे यासाठी आम्ही तन, मन व धनाने सदैव प्रयत्नशील असतो. सदभाव व्यसनमुक्ती केंद्र व्यसनपीडित व्यक्ती व त्यांचे कुटुंबियांशी कुठलाही भेदभाव न करता आपले कर्तव्य म्हणून मोकळ्या मनाने व समर्पित भावनेने वागत असते. सदभाव व्यसनमुक्ती केंद्रात व्यक्तीच्या मानसिक शक्तींचा व सद्गुणांचा विकास याला सर्वोतोपरी महत्व दिले जाते. संगठीतपणे टीम वर्क करून नवीन ज्ञान, विज्ञानाची मदत घेऊन आम्ही हे कार्य करीत असतो. आम्ही सदैव व्यसनपीडित व्यक्ती व त्यांच्या कुटूंबियांच्या अडचणी, दोष, त्यांचे अज्ञान इ. चा सातत्याने अभ्यास करीत असतो व त्यांच्या परिवर्तनासाठी सदैव प्रयत्नशील असतो. आम्ही आमच्या कार्याची सतत समीक्षा करून त्यातील दोष व उणीवा  यांच्यामध्ये सुधारणा व परिवर्तन घडवून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. आमच्यावर केलेली टीका आम्ही गांभीर्याने घेऊन त्यातील सत्य तपासण्याचा प्रयत्न करतो. परंतु दोष काढणारे किंवा टीका करणाऱ्यांची अवहेलना करीत नाही. सदभाव व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक मनोवैज्ञानिक श्री. अशोक शुक्ल यांनी सदभाव व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करतांनाच सतत सुधार व गुणवत्ता प्राप्ती हे आपल्या कार्य पद्धतीत समाविष्ट केले होते. हे वैशिष्ट्य सदैव जोपासले जाईल याची आम्ही ग्वाही देतो.


शारीरिक सुधार

शारीरिक सुधार - वैद्यकिय सुधार किंवा उपचारचेही पाच भाग पडतात. 

अ . विरहवेदनाचे नियंत्रण  - कोणतेही व्यसन अचानक बंद केल्यावर व्यसनपीडित व्यक्तीच्या शरीरात अनॆक उपद्रवी लक्षणे दिसू लागतात. उदा. कापरे सुटणे, अंग दुखणे, बेचेनि वाटणे, उलट्या-मळमळ होणे, नाकातून डोळ्यातून पाणी येणे, जांभया येणे, भ्रम होणे इत्यादी. या लक्षणांना विरह वेदना असे म्हणतात. काही वेळा या विरह वेदना जीवघेण्या असतात. व्यसनमुक्ती केंद्रातील तज्ञ मंडळी औषधोपचाराच्या साहाय्याने विरह वेदनांचे नियंत्रण व उपचार करतात. तथापि घरी व्यसन सोडू इच्छिणाऱ्या लोकांना विरह वेदनांचा धोका असतो. तसेच विरह वेदनांच्या भीतीमुळेच व्यसनी लोक घरी व्यसन सोडण्यात यशस्वी होत नाहीत. उलट अनेकदा मेडीकल प्रॉब्लेम उत्पन्न होतात व मग हॉस्पीटलकडे धाव घ्यावी लागते. 

ब.  निर्विषीकरण(डिटॉक्सिफिकेशन) - अमली पदार्थ हे स्लो पॉइझन असतात. दीर्घकाळ व्यसन केल्यानंतर हे विष आपल्या सर्व शरीरात पसरते व त्याचे दुष्परिणाम होतात. विशेषतः लिव्हर, मूत्रपिंड, त्वचा इत्यादी अवयवांवर अंमली पदार्थांचे दुष्परिणाम तीव्रतेने जाणवतात. लिव्हरवर सूज येते. तर काही वेळा जलोदरही होतो. तज्ञ डॉक्टर्स पूर्ण तपासणी करून औषधोपचार करतात. २ ते ३ आठवड्यात निर्विषीकरणाचे काम पूर्ण होते. 

क.  कुपोषण दूर करणे - व्यसनपीडित व्यक्ती व्यसनाधीन असतांना व्यवस्थित व पोटभर जेवत नाही. त्याच्या जेवणात समतोल आहार नसतो, तर अनेकदा तो जेवतही नाही, याचा परिणाम म्होणून त्यांचे शरीर कुपोषित होते. सद्भाव व औषधी व्यसनमुक्ती केंद्रात साधे संतुलित जेवण, दूध व केळी असा आहार दिला जातो. त्यामुळे एका महिन्यात व्यसनपीडित व्यक्तिचेही कुपोषण दूर होते. त्यामुळे २ ते ५ किलो वजन वाढते. 

ड.  अन्य आजारांचा उपचार - व्यसनपिडीत व्यक्तीला व्यसनामुळे अनेक आजार जडतात. पण व्यसनाच्या बेहोषीत त्याला त्या आजाराची जाणीव होत नाही. व्यसनमुक्ती केंद्रात अंमली पदार्थांचे सेवन बंद झाल्यामुळे व्यसनपिडीत व्यक्तीचे शरीर संवेदनशील होते व त्याला छोट्या-मोट्या आजारांची जाणीव व्हायला लागते. या सर्व आजारांची तपासणी व उपचार सद्भाव व्यसनमुक्ती केंद्रात होतात. 

इ.   आरोग्यवर्धक सवयी आत्मसात करणे - व्यसन लागण्याचे मुख कारण स्वभावातील काही दोष, मनमानी आचरण व आरोग्यविरोधी सवयी असतात.  व्यसनमुक्ती केंद्रात सर्व आरोग्य विरोधी सवयी व मनमानी आचरण बंद करून आरोग्य वर्धक सवयी व आजारापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक सवयी आत्मसात करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात, त्यामुळे व्यसन विरोधी व्यक्तिमत्व निर्माण होते.

CALL US FOR ANY ENQUIRY

8208445814, 8668908936