सदभाव प्रोफाईल
सदभाव केंद्र हे एक व्यसनमुक्ती निदान, उपचार व पुनर्वास केंद्र आहे. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी ह्या केंद्राची स्थापना हि १९८८ मध्ये करण्यात आली. स्थापना मनोविक श्री. अशोक शुक्ल यांच्या अध्यक्षेत झाली. त्यांचे सोबत सायकियाट्रिस्ट डॉ. प्रकाश नेमाडे, डॉ. उल्हास कडुस्कर, डॉ. प्रकाश भंगाळे, श्री. उत्तमसिंह फुटाणे, डॉ. श्री. नरेंद्र दाभोळकर, उच्च न्यायालयीन सेवा निवृत्त श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी, सिव्हिल सर्जन डॉ. एस. के. बनसोडे, इत्यादी महानुभावांनी आपले सक्रिय योगदान केंद्राच्या विकास कामात दिले. उद्द्योगपती श्री. भवरलाल जैन, स्थानिक नेते श्री. सुरेशदादा जैन, अॅड. श्री. सुनील अत्रे, खासदार स्व. श्री. वाय. एस. महाजन यांचेही योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. या केंद्रा द्वारा संपूर्ण महाराष्ट्रात व मध्यप्रदेश मध्ये नशाखोरी च्या विरोधात जनजागृती चे कार्य केले गेले.